BCPT इंग्रजी व्हिडिओ


 'English E. Teach'


        'English E. Teach' हा शिक्षण क्षेत्रातील एकअभिनव प्रयोग मुंबई स्थित BCPT(Bombay Community Public Trust) या स्वयंसेवी संस्थेनेहाती घेतलेला आहेया प्रकल्पाच्या माध्यमातूनआतापर्यंत मुंबई व महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्येहीविद्यार्थ्यांच्या अध्ययनामध्ये आमूलाग्र व सकारात्मकबदल झाल्याचे सर्वांनी अनुभवले आहेआता हाप्रकल्प महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये राबविण्यातयेत आहेया प्रकल्पामुळे विद्यार्थांचे अध्ययन हे सहजव हसत खेळत होणार आहे.

*English E. Teach प्रकल्प काय आहे?*
         हा प्रकल्प म्हणजे BCPT ने इ.1 ली ते 4 थीच्या पाठ्यक्रमावर आधारित बनवलेल्या व्हिडिओंचा 48 GB डेटा संच. यामध्ये इ. 1 ली ते 4 थीच्या इंग्रजी विषयाच्या सर्व पाठ्यक्रमाचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये Animation च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रंजक वाटेल अशा पद्धतीने activities डिझाइन केलेल्या आहेत. विशेष म्हणजे BCPT ने हा अध्ययन संच महाराष्ट्रातील सर्व शाळांना निशुल्क उपलब्ध करून दिला आहे.

*उद्दिष्टे*
➡ इंग्रजीची भीती दूर करणे
➡ हसत खेळत इंग्रजी शिकणे
➡ इंग्रजी अध्ययनात विद्यार्थ्यांना गोडी निर्माण करणे.
➡ अध्ययन अध्यापन प्रक्रियेततंत्रज्ञानाचा(technology) प्रभावी वापर करणे.
➡ अध्ययन अध्यापन प्रक्रिया विद्यार्थी केंद्रित वअध्ययन केंद्रित करणे.

BCPT द्वारा निर्मितENGLISH E-CONTENT DATAमिळवण्यासाठी पुढील इयत्तावार क्लिक करून मिळवा


No comments:

Post a Comment